ठळक बातम्या

    विजय पिदुरकर यांची यवतमाळ जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती; सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार यवतमाळ जिल्हा नियोजन समितीवर माननीय विजय पिदुरकर यांची नामनिर्देशित सदस्य तसेच विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे जिल्ह्याच्या विकासकामांना अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

    जिल्ह्यातील विविध विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत समस्या तसेच ग्रामीण व शहरी भागातील विकासाच्या प्रश्नांवर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रभावीपणे चर्चा केली जाते. या समितीवर विजय पिदुरकर यांची झालेली नियुक्ती ही त्यांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याची दखल मानली जात आहे.

    विजय पिदुरकर यांच्या अनुभवाचा आणि जनसामान्यांशी असलेल्या संपर्काचा जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, राजकीय व सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

    यवतमाळ जिल्ह्याच्या विकासासाठी नवी जबाबदारी मिळाल्याबद्दल विजय पिदुरकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

    Photo